डॉ संपदा या मुळ बेळगावच्या, त्यामुळे त्यांचे मराठी व कन्नड या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणे साहजिकच. MBBS नंतर All India परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून मुंबईच्या KEM या नामांकित महाविद्यालयातून त्यांनी आपले MD चे उच्चशिक्षण पूर्ण केले. आपल्या शिक्षण कालावधीत त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी सारख्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे.
महिला तज्ञ डॉक्टर इतरांच्या तुलनेत आपल्या रुग्णांना जास्त वेळ देतात, व्यवस्थित समजून घेतात, त्यामुळे त्यांच्या उपचारात जास्त परिणाम कारकता दिसून येते असे काही सर्वेक्षणातून देखील दिसून आले आहे. आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात महिला मानसोपचार तज्ञाची कमतरता होती जी आता डॉक्टर संपदा यांच्या रूपाने भरून निघत आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिक विशेषतः महिला व विद्यार्थी वर्ग आपल्या भावना व मानसिक समस्या मोकळेपणाने व्यक्त करू शकतील अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment